देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाखांच्या वर ; गेल्या २४ तासांत ८५ हजार ३६२ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे . मागील २४ तासांत देशभरात ८५ हजार ३६२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ५९ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ३ हजार ९३३ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ३ हजार ९३३ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ६० हजार ९६९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण, कोरोनामुक्त झालेले व डिस्चार्ज मिळालेले ४८ लाख ४९ हजार ५८५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९३ हजार ३७९ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER