भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या उंबरठ्यावर ; आतापर्यंत ५८१५ जणांचा मृत्यू

coronavirus-covid-19

मुंबई : भारतात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. मागील २४ तासांमध्ये ८९०९  नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच २०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात १ लाख ९८ हजार ७०६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५८१५  लोकांचा मृत्यू झाला असून ९५ हजार ५२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्याला कोरोना; ठाकरे कुटुंबाला खबरदारीचा सल्ला

दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे .मुंबईत काल दिवसभरात १ हजार ११७ नव्या रुग्णांची भर पडल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४२ हजार २१६ वर पोहचली आहे. तर एका दिवसात ४९ रुग्णांनी  जीव गमावल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ३६८ वर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER