मुख्यमंत्री ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ !

covid-19-160-members-of-uddhav-thackerays-security-team-quarantined

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६० कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या सर्वांना वांद्रे (पूर्व) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून कोविड-१९ तपासणीसाठी या सर्वांचे सँम्पल घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाजवळ असलेल्या चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याच्यावर जोगेश्वरी येथील हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.