स्वतःच ठेवायचं झाकून आणि…,भाजपचा मुख्यमंत्र्यावर पलटवार

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या करोना (Corona) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल(शुक्रवारी) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन संदर्भात दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचा इशाराही देऊन टाकला. तसेच, अन्य देशांनी घेतलेल्या निर्णयाची व तेथील करोना परिस्थितीची देखील माहिती देत, राज्यातील परिस्थितीशी तुलना केली. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने (BJP) मुख्यमंत्र्यावर पलटवार केला आहे. तसेच, “हतबल मुख्यमंत्री” असं संबोधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे विविध ट्विट देखील भाजपाकडून करण्यात आलेले आहेत.

लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? लॉकडाउन करायचा की नाही, याबाबत तुम्ही दोन दिवसांत ठरवताय. या दोन दिवसांतच हातावर पोट असलेल्यांनी कसं जगायचं, हे सुद्धा ठरवा आणि त्यांना दिलासा द्या …! असं भाजपाने म्हटलं आहे.

तसेच, स्वतःच ठेवायचं झाकून आणि… अशी गत झालीये तुमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. स्वतःच्या राज्यात इतका हाहाकार माजलेला असताना, तुम्ही दुसऱ्या देशांनी काय केलं, ते काय करताहेत याची माहिती जनतेला कशासाठी वाचून दाखवताय? असा प्रश्नही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

आधी करोना युद्धात स्वेच्छेने सहभागी झालेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काय मिळालं? मग डॉक्टर कुठून आणायचे? हा प्रश्न तुम्हाला पडणारच ठाकरेसाहेब. पुन्हा लढण्यासाठी डॉक्टर-वैद्यकीय कर्मचारी स्वतःहून पुढे का येत नाहीत? असा प्रश्न तुम्हाला पडत नाहीये का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? असे प्रश्न विचारत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कटाक्ष केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button