‘कोवॅक्सिन’सुद्धा झाली स्वस्त; भारत बायोटेकने जारी केली नवी किंमत

COVAXIN

हैदराबाद :- कोविशिल्ड (COVISHIELD) पाठोपाठ आता भारत बायोटेककडून (Bharat Biotech) ‘कोवॅक्सिन’ (COVAXIN) लसीची किंमत कमी करण्यात आली  आहे. मात्र, आता दोन्ही कोरोना (Corona) लसी स्वस्त झाल्या आहेत. भारत बायोटेकेने आपल्या कोरोना लसीची नवी किंमत जारी केली आहे. कोवॅक्सिन लसीचा प्रतिडोस राज्य सरकारसाठी ६०० रुपये तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लसीचा दर एक हजार रुपये ठेवण्यात आला होता. पण आता सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे. आता ४०० रुपये प्रतिडोस ही लस उपलब्ध होईल. जवळपास २०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीची किंमत कमी केली. सुरुवातीची कोविशिल्ड लसीची किंमत प्रतिडोस राज्यासाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये होती. मात्र, सीरमने कोविशिल्ड लसीचे दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता ४०० ऐवजी ३०० रुपयांना दिली जाणार आहे.

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी लसीची किंमत एक ठरवण्यास सरकारने सांगितले होते. यानुसार आपत्कालीन उपयोगात वापरात असलेल्या भारतातील दोन्ही लस उत्पादकांनी त्यांच्या लसीची किंमत जाहीर केली. पण यापेक्षा आणखी किंमत कमी करावी, अशी विनंती केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांकडे केली होती. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपल्या लसीची किंमत कमी केली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारसाठी नवे दर जाहीर केले आहेत. पण खासगी रुग्णालयांसाठी मात्र लसीचे दर बदललेले नाहीत. याबाबत अद्यापही सांगण्यात आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button