कोव्हॅक्सिन : साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई – भारत बायोटेक

bharat-biotech-covid-vaccine-covaxin

कोरोनावरील लस ‘कोव्हॅक्सिन’ घेतल्याने काही साईड इफेक्ट्स जाणवले तर लस निर्माण करणारी कंपनी ‘भारत बायोटेक’ (Bharat Biotech) यासाठी नुकसान भरपाई (Compensation ) देईल, अशी घोषणा भारत बायोटिकने केली.

कोविडच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला भारतात आज सुरुवात झाली. भारतात लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आज लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीला विरोध झाला. कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी याची नुकसान भरपाई देईन. कोव्हॅक्सिनला भारत सरकारकडून ५५ लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटले आहे की, “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.”

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने कोविड-१९ लसीविरोधात एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे. कारण, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजूनही सुरू आहे.

लसीकरणाच्या फॉर्ममध्ये म्हटले आहे की, लस घेतली म्हणजे कोविड-१९ पासून बचावासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणं बंद करावे, असे समजू नये. लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन द्यायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER