बाबरी मजीद प्रकरणातील निकाल माझ्यासाठी धक्कादायक – शरद पवार

Sharad pawar-Babri mosque

पुणे :  बाबरी मशीद (Babri mosque) विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाने नुकताच दिलेला निकाल माझ्यासाठी धक्कादायक असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, कोर्टाच्या निर्णयामुळे सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयाच्या निकालामुळे लोकांच्या न्यायावरील आणि न्यायालयीन व्यवस्थेवरील विश्वासावर विपरीत परिणाम होईल काय यावर मी भाष्य करणार नाही. मात्र या प्रकरणात असंख्य सबळ पुरावे सादर करण्यात आले असतानाही न्यायालयाने दिलेला निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता, असे पवार म्हणाले.

बाबरी मशिदीच्या विध्वंसाची घटना घडली तेव्हा केंद्रात नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्या सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते तर माधव गोडबोले तेव्हा केंद्रीय गृह सचिव होते. या प्रकरणात गोडबोले यांनी सखोल अभ्यास केला होता व पंतप्रधान नरसिंह राव यांना सल्लाही दिला होता. उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार वास्तूला धक्का लागू देणार नाही, असं सांगत असलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये, असे गोडबोले यांचे स्पष्ट मत होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांनी घेतली आणि दुर्दैवाने गोडबोले यांनी जी भीती व्यक्त केली होती तेच घडले, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी होऊ लागली, असे पवार म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर पवारांनी तरुणांना आवाहन केले की, आत्महत्या हा अंतिम तोडगा नाही. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तरुणांनी थोडा धीर ठेवावा. “कपिल सिब्बल सारख्या देशातील काही सर्वोत्कृष्ट वकिलांबरोबर मी चर्चा करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वाढविण्याच्या राज्याच्या निर्णयावर स्थगिती का दिली यावर चर्चा सुरु आहे. मी केंद्र सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करणार आहो, अशी माहितीही पवार यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : …तर देशाचं ऐक्य कसे टिकेल? शरद पवारांकडून धोक्याचे संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER