कोर्टाने मागितला कंगनाच्या विरोधातील तपासाचा अहवाल

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि तिच्या बहिणीने सोशल मीडियावर द्वेषमूलक संदेश प्रसारित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने (Court) कंगनाच्या सोशल मीडिया पोस्टची चौकशी केली आणि अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

तो अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करायचा होता. पण अहवाल सादर करण्यास पोलीस अपयशी ठरले. नंतर ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली. तरीही पोलीस अहवाल सादर करू शकले नाहीत. आता पुढील सुनावणी ४ मार्चला होणार आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून त्यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER