रमी खेळाचा प्रचार केल्याने तमन्ना भाटिया, विराट कोहलीला कोर्टाची नोटीस

Court notice to Tamanna Bhatia-Virat Kohli for promoting rummy game

देशात जुगार खेळणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र काही कंपन्या छुपेपणाने जुगार खेळण्यास लोकांना प्रवृत्त करीत असतात. इंटरनेट डाटा स्वस्त झाल्यापासून काही कंपन्यांनी मोबाईल अ‌ॅपच्या (Mobile app) माध्यमातून रमी खेळाचा (Rummy game) प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. हा जुगार खेळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करता यावे यासाठी बॉलिवुडमधील कलाकारांच्या माध्यमातून याची जाहिराती केली जाते. ऑनलाईन रमी खेळताना अनेकांनी आपले सर्वस्व गमावले असून काही जणांनी यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता या खेळाचा प्रचार करणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamanna Bhatia) केरळ न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

गेल्या वर्षी ऑनलाइन गेम्स आणि अ‌ॅप्सद्वारे रमी खेळताना अनेकांनी पैसे गमावले आणि त्यामुळे तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे केरळ न्यायालयात ऑनलाईन रमी खेळावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने तमन्ना भाटिया, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि साउथचा अभिनेता अजु वर्गीज याला नोटीस पाठवली आहे. हे तिघेही ऑनलाईन रमी खेळाचे ब्रॅन्ड अ‌ॅम्बेसेडर आहेत. न्यायालयाने याबाबत केरळ राज्य सरकारलाही नोटीस पाठवली आहे.

दुसरीकडे तामिळनाडू सरकारनेही जुगार सुरु असलेल्या ऑनलाइन गेम्स आणि अ‌ॅप्सवर बंदी ङातली आहे. यात रमी खेळाचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर हा खेळ खेळताना कोणी आढळले तर त्याला 5 हजार रुपये दंड आणि 6 महिन्याच्या शिक्षेचीही तरतूद केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER