
नवी मुंबई : वाशी टोल नाक्यावर मनसैनिकांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाने वॉरंट जारी केला आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.
या प्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून आता वॉरंट जारी करण्यात आला आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या दिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असंही कोर्टानं नमूद केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला