अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अमिषा पटेलविरोधात न्यायालयात खटला

Amisha Patel for fraud case

प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशनने (Rakesh Roshan) ने मुलगा हृतिकला (Hrithik Roshan) ला ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून लाँच केले होते. सुरुवातीला हृतिकच्या नायिकेच्या रुपात करीना कपूरला (kareena Kapoor) ला साईन करण्यात आले होते. पण अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) नायिकेची भूमिका मिळत असल्याने करीनाने हा सिनेमा सोडला होता. त्यानंतर करीनाच्या जागी राकेश रोशनने अमिषा पटेलला (Ameesha Patel) साईन केले. हृतिकचा हा पहिला सिनेमा सुपरहट झाला आणि अमिषा पटेल एका रात्रीत लोकप्रिय झाली. या सिनेमानंतर अमिषा पटेलकडे सिनेमांची रांग लागली. पण पहिल्या सिनेमाप्रमाणे यश काही तिला मिळाले नाही. सनी देओल (Sunny Deol) सोबतचा तिचा ‘गदर’ सिनेमाही सुपरहिट झाला होता. मात्र असे काही अपवादात्मकच सिनेमे होते. त्यानंतर यश मिळावे म्हणून अमिषाने अंग प्रदर्शनही केले पण यशाने तिच्याकडे पाठच फिरवली होती. आता तर एका व्यक्तीला अडीच कोटी रुपयांना तिने फसवल्याचे सांगितले जात असून या व्यक्तीने अमिषाविरोधात न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. यामुळे अमिषा चांगलीच अडचणीत आलेली आहे.

झारखंड येथील अजय कुमार सिंह हे लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक आहेत. 2017 मध्ये एका कार्यक्रमात अमिषा आणि अजय कुमार सिंह यांची भेट झाली होती. त्यावेळी अमिषाने एक कंपनीही स्थापन केली होती. या कंपनीचे नाव आहे ‘देसी मॅजिक’, भेटीच्या वेळी अमिषाने अजयकुमारला तिच्या कंपनीत गुंतवणूक करावी असे सुचवले. अजयकुमारने लगेचच सिनेमाची निर्मिती करण्यासाठी तिच्या अकाउंटवर अडीच कोटी रुपये ट्रांसफर केले. पैसे आल्यानंतर मात्र अमिषाने सिनेमात काम करण्यास नकार दिला. सिनेमा तयार होत नसल्याचे पाहून अजयकुमारने तिच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. पण अमिषा प्रत्येक वेळेस त्याला पैसे परत न करता फक्त पैसे परत करण्याचे आमिष दाखवत होती. एकदा अमिषाने अडीच कोटींचा चेक दिला पण तो चेकही बाऊंस झाला. एवढेच नव्हे तर अमिषा धमकावत असल्याची तक्रारही अजयकुमारने केली होती. अखेर अजयकुमारने न्यायालयात तक्रार दाखल केली. झारखंड उच्च न्यायालयाचे जज आनंद सेन यांनी व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटला ऐकला आणि अमिषा पटेलला 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या या आदेशाबाबत अमिषाशी संपर्क साधून तिची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण तिच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER