‘देश का चौकीदार चोर है’ राहुल गांधी यांची खोचक टीका

Rahul gandhi

राजस्थान :- राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी सज्ज असतात. आता पुन्हा राहुल गांधींनी ‘देशाचा रखवालदार चोर असल्याचे लोक म्हणत आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल संगवारा भागात राहुल गांधी यांची सभा झाली,त्यावेळी ते बोलत होते.

राफेल करार आणि विजय माल्ल्याने केलेला व्यवहार या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधानांनी मौन बाळगले आहे. ते स्वतःला देशाचे चौकीदार समजतात. परंतु, आता ‘गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है’ असे सर्वत्र ऐकू येत आहे, असे राहुल गांधींनी या सभेत म्हंटले. राहुल गांधींच्या या टोमण्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तातडीने या विधानावर टीका केली. काँग्रेसच्या अध्यक्षांना पंतप्रधानांबाबत कोणताही आदर नाही, असे स्मृती इराणी राहुल गांधींना म्हणाल्या.