‘सौंगध मुझे इस मिट्टी की, देश नहीं मिटने दूंगा; देश नहीं रुकने दूंगा’ – नरेंद्र मोदी

countrymen-country-safe-hands-narendra-modi

चुरु : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेनेनं आज ‘एअर स्ट्राइक’नं घेतला. जवानांच्या शौर्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आहे.

राजस्थानमधील चुरुमध्ये जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींना भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले. तसेच, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. आज पुन्हा एकदा देशाला हा प्रधानसेवक नमन करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ही बातमी पण वाचा:- मोदींच्या निगराणीखाली झाला हल्लाबोल, कारवाईवेळी स्वतः वाररुममध्ये होते हजर!

पाकव्याप्त काश्मीरमध्ये १००० किलोचे बॉम्ब टाकून भारताने २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या धडाकेबाज कामगिरीनंतर, राजस्थानातील चुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशरक्षणाची शपथ घेतली. देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी मतदारांना ‘मिशन २०१९’ साठी सादही घातली. ‘देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं रुकने दूंगा’ अशी कविता नरेंद्र मोदी यांनी यावेळी सादर करत केली.

नरेंद्र मोदींनी सादर केलेली कविता अशीः

सौंगध मुझे इस मिट्टी की
मैं देश नही मिटने दूंगा
मै देश नही रुकने दूंगा
मै देश नही झुकने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की…

मेरा वचन है भारत मां को
तेरा शीश झुकने नही दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की…

जाग रहा है देश मेरा
हर भारतवासी जितेगा
सौंगध मुझे इस मिट्टी की
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की…

हमे फिर से दोहराना है
और खुद को याद दिलाना है
न भटकेंगे, न अटकेंगे
कुछ भी हो हम देश नहीं मिटने देंगे

सौंगध मुझे इस मिट्टी की
मै देश नहीं मिटने दूंगा ।।

शेतकरी सन्मान योजनेसाठी राजस्थानच्या काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांची यादी पाठवली नाही, असा आरोप करत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आता शेतकरी बँकेत जाऊन पैसे काढू शकतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हि बातमी पण वाचा : मोदींना आता निवडणूक सोपी