या देशाला हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर या शिवसेना अत्यंत गरजेची – संभाजी भिडे

Shmbhaji Bhide

सांगली : आज शिवसेनाप्रमुख ‘या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना अत्यंत गरजेचे आहे. हे माझं वैयक्तिगत मत नसून राष्ट्रीय मत आहे, असं शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी दाव्यासह सांगितले. सांगलीच्या स्टेशन चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने संभाजी भिडे यांनी शिवसेनेबद्दल भरभरून बोलत होते.

यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, संपूर्ण देशात शिवसेनेचा मोठ्याप्रमाणात विस्तार व्हावा. त्यांची ही इच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचे काम हयात असलेल्या लोकांना करायचे आहे. ‘नामकरण होईल पण कामाचे काय आहे. या सांगली शहरात 200 ते 250 शिवसेनेच्या शाखा का नाहीत. याचे अतीव दु:ख आहे. याचा विचार करून आपण सर्वांनी काम केले पाहिजे. हेच खरे नामाकरण ठरणार आहे. हा प्रवाह अखंड चालू राहिला पाहिजे’ अशी इच्छा भिडे यांनी बोलून दाखवली.

‘हा संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या फोटो नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. हे लक्षात ठेवून काम आपल्याला करायचे आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातच होणे शक्य आहे, हे माझे ठाम मत आहे. ज्या प्रकारे अन्न, पाणी आणि निवार मनुष्याला गरजेचा आहे, त्यामुळे या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कामावर आपण तुटून पडले पाहिजे, काम वाढवूया, लोकांमध्ये जाऊया, हे माझं वैयक्तिगत मत नाहीतर राष्ट्रीय मत आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER