आज देशाला सावरकरांच्या विचारांची आणि त्यांच्या हिंदूत्त्वाची सर्वाधिक आवश्यकता – फडणवीस

CM Fadnavis

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘अध्यात्मवादी स्वातंत्र्यवीर सावरकर’ या कार्यक्रमाला आज मुंबई येथे उपस्थित होतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, आशीष शेलार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

वीर सावरकरांच्या विज्ञानवादाचा, साहित्याचा, सामाजिक कार्याचा आणि क्रांतिकारत्वाचा मागोवा घेत असतानाच अध्यात्मिक अर्थाने सुद्धा त्यांना समजावून घेण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.

स्वांत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवणार

अध्यात्माची बैठकच माणसाला आत्मबळ देते.विपरित परिस्थितीत स्वातंत्र्यवीरांनी कधी हार मानली नाही.त्यांचे बलिदान अतुलनीय होते. जाज्वल्य देशप्रेम निर्माण होण्याला त्यांचे अध्यात्मच कारणीभूत होते.वीर सावरकरांच्या हिंदूत्त्व मांडणीत सुद्धा कर्मकांडाला नाही,तर वैज्ञानिकतेचा आधार मोठा आहे

इंग्रजांकडून हालअपेष्टांपासून ते अगदी आजच्या काळात सुद्धा दुस्वास नशिबी येणारा हा कदाचित एकच स्वातंत्र्यमातेचा सुपूत्र आहे. हिंदूत्त्व हा केवळ धर्म नाही, तर तो या देशाचा आत्मा आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी या आत्म्याला नाकारण्याचे काम होत असेल तर ते दुर्दैवी आहे.

आत्मा ज्याप्रमाणे जाळता येत नाही, मारता येत नाही, पाण्यात वाहून टाकता येत नाही, तसेच आपले हिंदूत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा हिंदूत्त्व कमजोर होतं, तेव्हा-तेव्हा आपण पारतंत्र्याच्या जवळ जातो. आज देशाला सावरकरांच्या विचारांची आणि त्यांच्या हिंदूत्त्वाची सर्वाधिक आवश्यकता आहे.