चार वाजल्यानंतर मतमोजणीस सुरुवात

मतमोजणी

पुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात मतदानाची वाढलेली टक्केवारी, उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रिका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे, त्यानंतर पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी उद्या गुरूवारी दुपारचे चार वाजणार आहेत. पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास उलट्या क्रमांने पसंतची मते मोजली जाणार आहेत. मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाला हाती येण्यासाठी दुसऱ्या दिवशी शुक्रवारचे पाच वाजतील अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख (Vijay Singh Deshmukh) यांनी सांगितले.

बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणी होणार आहे
पदवीधरसाठी ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार पन्नास (५७.९६ %) मतदारांनी मतदान केले, तर शिक्षक मतदार संघात ५२ हजार ९८७ (७३.०४%) मतदारांनी मतदान केले आहे. पदवीधर मतदार संघासाठी ६२ उमेदवार असल्याने ही मतपत्रिका जम्बो झाली. त्यामुळे मतपत्रिका हाताळण्यासाठीही विलंब लागणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ३५ उमेदवार आहेत. शिक्षक मतदार संघ ७२ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९८७ म्हणजेच ७३. ०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या टप्प्यात वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. पदवीधरसाठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४५ टेबल लावले आहेत. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी सहा हॉल आहेत. पदवीधरसाठी १३० पर्यवेक्षक, २५५ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक करण्यात आली. ‘शिक्षक मतदार’साठी ४५ पर्यवेक्षक, ८५ सहायक आणि ४५ शिपायांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षेसाठी ५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER