नामांकित कंपन्यांचे बनावट घड्याळ

कारखान्यावर गुन्हेशाखेच्या छापा

Counterfeit watches

मुंबई :- नामांकित कंपन्यांचे बनावट घड्याळ बनवून बड्या बाजारात त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने पर्दाफाश केला आहे. मस्जीद बंदर येथील त्यांच्या कारखान्यावर छापा टाकत बनावट घड्याळ हस्तगत करण्यात आली आहे. अफजल अहमद मोहम्मद आरिफ अन्सारी (40 )आरोपीचे नाव आहे.

मजीत बंदर येथील काजी सय्यद स्ट्रीट च्या दुसऱ्या माळ्यावरील खोली क्रमांक 206 मध्ये ही बनावट घड्याळे बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकत 4180 बनावट घड्याळ जप्त केली आहेत. याचे बाजार मूल्य २० लाख 97 हजार 450 इतकी आहे. कारखाना ताळे ठोकत गुन्हे शाखेने कारखाना मालक अन्सारी याला अटक केली आहे. घड्याळ खरी असल्याचे भासवून विविध बाजार बाजारात विक्री करत असेल यामुळे संबंधित कंपन्यांना याचा फटका बसत होता याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

ही बातमी पण वाचा : आधी चोरी नंतर भेसळ करून विक्री…