उटणे – फक्त दिवाळी पुरतेच नाही महत्त्वाचे !

उटणे

दिवाळी (Diwali) आली की फराळ अभ्यंग स्नान दिवे रांगोळ्या या सर्व गोष्टींची तयारी सुरु होते. उठा उठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली ही हाक अगदी प्रत्येक घरात ऐकू येते. सुगंधी तेल सुगंधी उटणे याचा दरवळ शरीराला येतो. लहान मुलं नाराजीने तर मोठी माणसं रीतभात म्हणून उटणे लावून घेतात. पण खरंच उटणं म्हणजे काय ? त्याचे फायदे काय ?

आयुर्वेदात ऋतुनुसार शरीराचा वर्ण कांती उजळविणारे वनस्पती चूर्णाचा वापर स्नानाकरीता सांगितला आहे. थंडीची सुरवात झाली की त्वचा रुक्ष होते. त्यानुसार तेलाने मालीश करणे व उटण्याने स्नान करणे आवश्यक ठरते. तेल अगदी साधे तीळाचे घेणे देखील फायदेशीर आहे.

आजकाल बाजारात आयुर्वेदाच्या नावाखाली कुणीही बुळबुळीत पावडरी, चिकट व अत्तर टाकलेले चूर्ण उटणे म्हणून विकतात. ज्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते.

आयुर्वेदात (Ayurveda) उद्वर्तन म्हणजे एक नित्य दिनचर्येचा भाग आहे. रोज सकाळी व्यायाम अभ्यंग व उटणे लावून स्नान करण्यास सांगितले आहे.

कफाचा नाश करणारे, मेद कमी करणारे, त्वचा शिथिल न होऊ देणारे, त्वचा कांतीयुक्त करणारे उटणे आहे. यव, मसूर पीठ यात ऋतुनुसार औषधी वनस्पती चूर्ण मिश्रीत करून हे उटणे वापरण्यास सांगितले आहे.

  • रोगकूपांमधे जमलेला मळ स्वच्छ होणे, त्वचा मऊ, टवटवीत होणे हे या उटण्याव्दारे अपेक्षित आहे.
  • अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानी उटण्याचा वापर केला पाहिजे. उटणे लावून मग स्नान करावे.

उटण्यात रोज कोणती चूर्ण वापरता येतात ?
मसूर त्वचेसाठी उत्तम सांगितले आहे. दूध वा पाण्यात याचे पीठ मिश्रण करून रोज वापरू शकतो.

चंदन वाळा सुगंधी कचोरा, हळद ही चूर्ण त्वचेसाठी छान काम करतात. ही सर्व द्रव्य सुगंधी आहेत शिवाय त्वचेसाठी फायदेशीर त्यामुळे वेगळे अत्तर केमिकल टाकण्याची गरजच पडत नाही. मसूर पीठ यव किंवा चण्याचे पीठात ही चूर्ण मिसळून उत्तम उटणे बनू शकते.

त्यामुळे दिवाळीकरीता उटणे घेतांना स्वस्त म्हणून केमिकलयुक्त पावडरी घेत नाही ना याची खात्री करून घ्या.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER