शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे – संजय निरुपम

- प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीच्या धाडीनंतर प्रतिक्रिया

Sanjay Nirupam - CM Uddhav Thackeray

मुंबई :- शिवेसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या  (ईडी) (ED)  पथकाने आज (मंगळवारी) सकाळी धाड टाकली. यावर सरकारमध्ये शिवसेनेचा सहकारी असलेल्या काँग्रेसचे (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी प्रतिक्रिया दिली – भ्रष्टाचार करून शिवसेनेचे जे नेते मोठे झाले आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे; यावर राजकीय सुडाची कारवाई म्हणून टीका करू नये.

ते म्हणाले – शिवसेनेच्या नेत्यांनी मागील काही वर्षांमध्ये भरपूर भ्रष्टाचार केला. अवैध संपत्ती जमा केली आहे. कोणी ना कुणी त्याचा तपास करेलच. आज ठाण्यातील ज्या आमदाराच्या घरी  ईडीची धाड पडली त्यांनी काय काय केले हे मला माहीत नाही. ते चौकशीनंतरच समोर येईल. मात्र त्यांच्यासारखे खूप लोक आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. शिवसेनेचे जे मोठे नेते आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या प्रक्रियेस राजकीय द्वेष म्हणणे टाळले पाहिजे.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकार स्थिर, पवारांना काय करायचं ते करतील – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER