कोरोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

Chandrakant Patil

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील (Chandrakant Patil) यांनी यावरून राज्य सरकावर टीका केली आहे.

दूध दर वाढीसाठी महाराष्ट्रात भाजपाकडून शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मावळमध्ये आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

कोरोनाला हरवण्यासाठी भाजपा जेवढे प्रयत्न करत आहे, तेवढं महाविकासआघाडी सरकार करत नसल्याचे सांगत, करोना महामारीविरोधात लढण्यास लागणाऱ्या पीपीई किट, तात्पुरत्या उभा करत असलेल्या कोविड सेंटर, मृतदेहाला लागणाऱ्या बॅगा यात या सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळते , ब्रँडेड साडेचारशे मग १३०० रुपयांना किट हे सरकार घेत असून, करोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यास मोकळे आहे असेही पाटील म्हणाले.

कोरोनाचा नायनाट करण्याची भाजप सुरुवातीपासूनच धडपड करत आहे .या तुलनेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपण काहीच करताना दिसत नाही . महाराष्ट्रात साडेचार महिन्यांपासून 2 कोटी 88 लाख लोकांना जेवण दिले . 40 लाख लोकांना किरणा सामानाचे पॅकेट्स दिले. नागरिकांची स्क्रिनिंग आम्ही करत आहोत. हिंजवडीत 104 बेडचं कोविड सेंटर उभारले आहे. असे गावोगावी सुरू करत आहोत. कोणाकडे आम्ही दुर्लक्ष करत नाहीत, असेही पाटील म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER