करोना काळातला महाराष्ट्रातला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा – फडणवीस संतापले

uddhav Thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : करोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे असा संताप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर पत्रपरिषदेत व्यक्त केला.

ते म्हणालेत, करोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत आहेत मात्र सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे! अजूनही करोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही.

मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असा आरोपही फडणवीस यांनी केला.

अधिवेशनही अवघ्या सात तासांचे घेतले जाते आहे, त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे? असे फडणवीस यांनी विचारले. या सरकारने वाढीव वीज बिलांत सवलत देण्याबाबत घूमजाव केले. कोल्हापुरात पुरात वाहून गेलेल्या एका घरालाही विजेचे अडीच हजार रुपये बिल पाठवण्यात आले आहे यावरुनच कारभार कसा चालला आहे, हे लक्षात येते. वाढीव वीज बिलांबाबत आणि सरकारच्या या धोरणाबाबत आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मेट्रो कारशेड फक्त अहंकारातून कांजूरमार्गला हलवण्यात आले. राजकीय आकसापोटी सुरु असलेल्या योजना हे सरकार बंद करते आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालतो अशी घोषणा केली. या सरकारमध्ये एकवाक्यता नाही, ओबीसी आरक्षणासाठी या सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. मंत्र्यांना मोर्चे काढण्याचा अधिकार नाही त्यांनी हा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडला पाहिजे असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER