कल्याण-शीळ रस्ते विकास कामात भ्रष्टाचार; मनसे आमदाराचा आरोप

MNS Raju Patil

कल्याण : मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कल्याण-शीळ रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या कामाच्या गुणवत्ता तपासण्याकरीता स्वखर्चातून थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

“कल्याण-शीळ रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ते विकासाचे काम करण्यात आले आहे. त्याठिकाणी दुरुस्तीचेही काम सुरू आहे. काही ठिकाणी डांबराचे पॅच मारले जात आहेत. या कामात तीन वेळा कंत्राटदार बदलला गेला. कामात कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नाही. या कामात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना तो खरा असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरील काटईचा टोल नाका बंद केला आहे. हा टोल नाका ना हटवल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.” असे राजू पाटील यांनी सांगितले आहे.

या रस्ते कामाची पाहणी करण्याची मागणी अधिकारी वर्गाकडे केली आहे. अधिकारी पाहणी दौरा करण्यास टाळाटाळ करत आहे. वारंवार सांगूनही पाहणी केली जात नाही. त्यांना रस्त्यावर उभे करून जाब विचारला जाईल. मात्र, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, अधिकारी वर्गास रस्त्यावर उभे करून त्यांना जाब विचारणार, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button