उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच भ्रष्टाचार; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खुलेआम होतेय पैशांची मागणी

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीत भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती आहे .

जमीन, सदनिका खरेदी-विक्रीपासून भाडेकरार, जुने दस्त मिळविणे या असंख्य कामांकरिता बारामतीच्या (Baramati) दुय्यम निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांचा मलिदा उघड-उघड दुय्यम निबंधक कार्यालयांमधून लुटला जात आहे.

बारामतीतच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढली आहे. तर हा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या एका व्यक्तीने दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक-१ च्या कार्यालयातील अधिकाऱ्यास दीड हजारांची लाच देण्यास भाग पडले असल्याचे सांगितले. त्यातही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने लाचखोर अधिकारी चांगलेच फोफावले आहेत. मात्र, मोठ्या जोखमीच्या आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही त्रुटी काढून आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी तक्रार करायला कुणीच समोर येत नाही. त्यामुळे लाचखोरांचे चांगलेच साधत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button