भ्रष्ट कस्टम्स अधीक्षकासह पत्नीसही झााला तुरुंगवास

jailed

मुंबई : न्हावा-शेवा येथील जवाहरलाल नेहरु  बंदरातील सीमाशुल्क विभागाचे (Customs Dept.) माजी अधीक्षक बेनुधर सामळ आणि त्यांची पत्नी ज्योत्स्नामई यांना भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याखालील येथील विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराबद्दल अनुक्रमे तीन व दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी अधिकार्‍याच्या भ्रष्टाचारात सहभागी होऊन त्यास साथ दिल्याबद्दल त्याच्या पतीनालाही शिक्षा होण्याची ही विरळा घटना आहे.

बेनुधर व ज्योत्स्नामई यांना एकूण ८० हजार रुपयांचा जामिनही ठोठावण्यात आला. शिवाय या दाम्पत्याने कथित भ्रष्टाचारातून मिळविलेली ८७.८२ लाख रुपये किंमतीची मालमत्ताही जप्त करून सरकारजमा करण्याचा आदेश देण्यात आला. खटला प्रलंबित असताना दोन्ही आरोपी जामिनावर होते. या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी शिक्षेला चार आठवड्यांची स्थगितीही दिली गेली.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence-DRI)  सन २००९ मध्ये सामळ यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडीतून हा खटला उभा राहिला होता. धाडीता त्यांच्या घरी ५६ लाख रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली होती, सामळ यांनी सन २००४ ते २०१० या काळात आपल्या पदाचा दुरुपयोग करून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून ९० लाख रुपयांची जास्त संपत्ती गोळा केली, असा खटल्यातील मुख्य आरोप होता. धाडीत राहता बंगला, दागिने व बँकेतील ठेवी अशी जी संपत्ती सापडली ती आपली आहे व तिचा आपण प्राप्तिकर रीटर्नमध्ये वेळोवेळी हिशेब दिला आहे, असा ज्योत्स्नामई  यांचा दावा होता. परंतु उपलब्ध पुराव्यांवरून न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, ज्योत्स्नामई  यांचा एवढी संपती घेण्याएवढा उत्त्पन्नाचा स्रोत नाही. त्यामुळे ही संपती बेनुधर यांनी भ्रष्ट मार्गांनी मिळवून पत्नीच्या नावावर केली आहे, हे उघड आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER