योद्ध्यांमधले भ्रष्ट आणि व्यवस्थेतले अनाम वीर…

Pm Modi & Uddhav Thackeray

Shailendra Paranjapeदेशभरातल्या करोना रुग्णांपैकी ८० टक्के केवळ दहा राज्यातले आहेत आणि त्यामुळं या राज्यांनी करोनाची लढाई जिंकली तर देशही जिंकेल, असं पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी सांगितलं आहे. त्या दहा राज्यात अर्थातच महाराष्ट्रही आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाची (Corona) दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांना सांगितलंय.

मुंबईत धारावीसारखी आशियातली मोठी झोपडपट्टी असो की वरळीसारखा बीडीडी चाळींसह टोलेजंग इमारतींचा भाग, तिथंही करोना नियंत्रात आणण्यात यश मिळालंय. अर्थात, करोनाशी मुकाबला करताना जोधपूर पँटर्न बारामतीत राहवला गेला आणि तिथे रुग्णसंख्या अटोक्यात आली. त्याचंच नाव बारामती पँटर्न असंही करण्याचा प्रयत्न झाला आणि पुण्यात बारामती पँटर्न राबवा असं पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी सांगितलं होतं. पण पब्लिक मेमरी इज शॉर्ट, असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. करोनाच्या चार महिन्यांच्या लढ्यात अनेक गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. त्यामुळं कुठेच अस्तित्वात नसलेल्या बारामती पँटर्नची आठवण करून दिली. तो पुण्यात यशस्वी झाला नाही आणि धारावी-वरळीत यशस्वी झालेले राज्यकर्ते मुंबईत चाचण्यांची संख्याच वाढवायला तयाक नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे.

करोनासारख्या रोगाबाबत संशोधन जगभर सुरू आहे कारण त्यावर औषध नाही. म्हणूनच एका ठिकाणी यशस्वी झालेले उपाय दुसरीकडे होतीलच, असं छाती कपणे सांगणं योग्य नाही. केरळमधे सुरुवातीला करोना संसर्ग दर निगेटिव्ह म्हणजे उणे करण्यात यश आले होते पण नंतर केरळ किनारपट्टीवर रोग पसरला होता. तसंच सुरुवातीच्या काळात पटकन निष्कर्ष काढणं योग्य नाही, हेही आता लक्षात येत चाललंय.

करोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय तसंच रुग्णालयांशी संबंधित कर्मचारी अशा सर्वांचे करोना योद्धे म्हणून गुणगान केलं गेलं. अनेक राज्यात त्यांना वाढीव पगार देण्याचेही निर्णय झाले. पण अगदी गेल्या २-३ दिवसातल्या पुण्याल्या बातम्या पाहिल्या तर रुग्णालयांमधे, डेडिकेटेड कोविड केंद्रांमधे आयसोलेशन केंद्रात आणि एकूणच करोनाच्या उपचार-निगा या सर्वांमधे भरमसाठ पैसे आकारून सामान्यांना लुबाडण्यात येत असल्याचं बातम्यातून प्रतिबिंबित होतंय. हे धक्कादायक आहेच पण त्याहीपेक्षा धक्कादायक आहे ती विविध रुग्णालयातल्या बिलांच्या रकमातली तफावत. काही ठिकाणी दहा अकरा दिवसांचा खर्च एक लाखापर्यंतचा तर त्याच प्रकारच्या रुग्णाला तितक्याच कालावधीसाठी अडीच लाख रुपये मोजावे लागलेत.

रुग्णाला करोना संसर्ग आहे म्हटलं की जवळच्या नातेवाइकाला कोणताही अँक्सेस नाही आणि कोणतीही माहिती दिली जात नाही. नंतर बिलावर प्रश्नचिन्ह लावल्यावर आणि प्राणवायू न देताच त्याचं बिल लावलंय, असं निदर्शनाला आलं की चुकून लावलं गेलंय, अशी उत्तरं. एका रुग्णालयात डॉक्टर २४ तासात पाच वेळा रुग्णाला बघून गेले म्हणून प्रत्येक वेळी बघण्याचे पाच हजार रुपये लावल्याचाही प्रकार बातम्यांमधून समोर आला आहे.

आता या सर्वांना करओना योद्धे कसं म्हणायचं, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे महापालिकेच्या सेवेत पूर्णवेळ नसूनही कीटकनाशके मारण्याच्या विभागात टेम्पररी काम करणारे अनेक युवक जीव धोक्यात घालून काम करताहेत. वास्तविक त्यांना पूर्ण वेळ नोकरी मिळेल याची खात्री नाही तरीही तीनेशके जण हे काम पालिकेच्या पंधरा वॉरड्समधून अविरतपणे करत आहेत. त्यांच्या कामाची दखल मिडियावाले, टीव्हीवाले यांनी घ्यायला हवी.

तीच गोष्ट शहरातला कचरा उचलणारे पालिका सेवेतले कर्मचारी तसंच स्वच्छ सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे काम करणारे दहा हजार कचरावेचक यांनाही सलाम करायला हवा. वैद्यकीय, निमवैद्यकीय या योद्ध्यांच्या बरोबर या सफाई कर्मचारी कीटकनाशके, औषध फवारणी करणारे या सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. तरच करोनाबरोबरचं युद्ध जिंकता येईल आणि त्यांचही मनोबर वाढेल.

ही बातमी पण वाचा : गणपतीसाठी गावोगावी जाऊ नका…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER