
मुंबई : शिवसेनेला (Shivsena) जोरदार धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना सोमवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला .
मात्र सानप यांच्या प्रवेशाने भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला आहे . यावरून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत .
सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका (Nashik Mahanagarpalika) निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला