कोरोनील औषधी विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही; अनिल देशमुख यांचे ट्विट

Coronil - Anil Deskhmukh

मुंबई :- योगगुरू रामदेव बाबा यांचे कोरोनावरील कोरोनील औषध बाजारात आले आहे. मात्र राज्य सरकारने या औषधाला महाराष्ट्रात विक्री करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रामदेव बाबा (Ramdev Baba) यांना मोठा झटका लागला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विटद्वारे रामदेव बाबा यांना मोठा झटका दिला आहे. पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही पतंजली आयुर्वेदातील हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नाही, असे सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

WHO आणि आयएमएचा आक्षेप

रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थिती कोरोनील औषधाचे लाँचिंग केले. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमाणपत्र मिळाले आहे. WHOनुसार, कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिले नाही, असे स्पष्ट केले. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचे औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर कोरोना लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी? असा प्रश्नही विचारला आहे. कोरोनीलवरून झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीने यावर स्पष्टीकरण दिले. पतंजलीचे आचार्य बालक्रिष्ण म्हणाले की, “आम्ही काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. WHO ने आमच्या औषधाला मंजूरी दिलेली नाही किंवा नाकारलेदेखील नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागाने दिले आहे. WHO जगभरातील लोकांचे चांगले आरोग्य सांभाळण्यासाठी काम करते.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER