
मुंबई : बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोनावरील नवीन औषध लॉन्च केले आहे. या औषधाला ‘कोरोनील’ असे नाव दिले . यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्शित होते. या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. कोरोनील गोळ्यांना आयुष मंत्रालयाने कोरोनावरील औषध म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनावरील औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचीही मान्यता आहे, असे पतंजलीने म्हटले आहे.
बाबा रामदेव म्हणाले की, “भारत आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. योगा आणि आयुर्वेदला वैज्ञानिक प्रमाणानुसार सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. पतंजलीने हजारो रीसर्च पेपर पब्लिश केले. तसेच योगाला वैज्ञानिक तथ्यांसह जगासमोर ठेवत आहे.” कोरोनीलबद्दल सांगताना ते म्हणाले की, “कोरोनील लॉन्च केला, तेव्हा अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले. काही लोकांचे मत आहे की, संशोधन फक्त पाश्चात्य देशात करतात. बरेच लोक आयुर्वेदावर संशय करतात. कोरोनील अनेक आजरांवर उपयुक्त होईल का? यावर संशोधन सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
पतंजलीने यापूर्वी २३ जून २०२० ला कोरोनील औषध काढले होते. बाबा रामदेव यांचा दावा होता की, आपण कोरोनील घेतल्यास सात दिवसात कोरोना बरा होतो. नंतर हे औषध वादात आढळले. तसेच या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे स्पष्टीकरण पतंजलीचे सीईओ बाळकृष्ण यांनी दिले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला