कोरोना : २१३ देशांमध्ये कहर सुरूच; रुग्णांचा आकडा ५३ लाखांवर

COVID-19

मुंबई :- जगभरात कोरोनाचा कहर सुरूच असून २१३ देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजच्या घडीला जगभरात कोरोनाचा ५३ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. मागील २४ तासांत जगातील २१३ देशांमध्ये १,०७,७०६ नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं ५,२४५ जण बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण ५,३०३,७१५ लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ३९ हजार ४१८ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २१ लाख ५६ हजार २८८ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील ७५ टक्के कोरोनाबाधित हे केवळ १२ देशांमध्येच आहेत. या १२ देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ४० लाखांच्या घरात आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे १,२४,७९४ रुग्ण आहेत. तर ३,७२६ बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात ६९,२४४ अक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५१,८२४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एकतृतीयांश कोरोना केसेस तर एकतृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत १६,४५,०८४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर ९७,६४० लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत ३६,३९३ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या २,५४,१९५ इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-१९ मुळं २८,६२८ लोकांचा मृत्यू झाला. २,८१,९०४ लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत ३२,६१६ मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा २,२८,६५८ इतका आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित?

अमेरिका : कोरोनाबाधित- १,६४५,०८४, मृत्यू- ९७,६४०
ब्राझील : कोरोनाबाधित- ३३०,८९०, मृत्यू- २१,०४८
रशिया : कोरोनाबाधित- ३२६,४४८, मृत्यू- ३,२४९
स्पेन : कोरोनाबाधित- २८१,९०४, मृत्यू- २८,६२८
यूके : कोरोनाबाधित- २५४,१९५, मृत्यू- ३६,३९३
इटली : कोरोनाबाधित- २२८,६५८, मृत्यू- ३२,६१६
फ्रांस : कोरोनाबाधित- १८२,२१९, मृत्यू- २८,२८९
जर्मनी : कोरोनाबाधित- १७९,७१३, मृत्यू- ८,३५२
टर्की : कोरोनाबाधित- १५४,५००, मृत्यू- ४,२७६
इराण : कोरोनाबाधित – १३१,६५२, मृत्यू- ७,३००

१२ देशांमध्ये प्रत्येकी एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझील, यूके, इटली, भारत आणि पेरु हे १२ देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा एक लाखावर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये २५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा ९७ हजारांवर गेला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER