बीडसाठी पुन्हा धावले शरद पवार आणि रोहित पवार, तात्काळ केली मदत; धनंजय मुंडेंनी मानले आभार

sharad Pawar-Rohit Pawar-Dhananjay Munde

बीड : कोरोनाला हरवण्यासाठी सरकारी यंत्रणांसोबतच काही उपाययोजनाही महत्वाच्या आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोनाशी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सॅनिटायझरची मागणी केली. आणि शरद पवार यांनी तात्काळ धनंजय मुंडेंच्या मागणीला प्रतिसाद देत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला ६०० लिटर सॅनिटायझर दिले.

सोमवारी बारामती ऍग्रोच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे ६०० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मुंडे यांनी शरद पवार, आमदार रोहित पवार व पवार कुटुंबियांचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्सची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत. बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता बारामती ऍग्रो कडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला पवारांनी लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला.

मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही रोहित पवारांनी बारामती ऍग्रोच्या वतीने जिल्ह्यात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता.

लॉकडाऊनः गरजूंना आधार, ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन’ थाळीचा