माहोल व्हायरस !

Coronavirus

असेच इतिहास घडतात. गेल्या कित्येक दिवस अनुभवलेली नसेल, अशी महामारी ची पहिली लाट आली तेव्हा एवढे काही जाणवले नव्हते. नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे ! दुसरी लाट आली मात्र ती प्रत्येकाच्या उंबऱ्या पर्यंत येऊन पोहोचली. एका दिवसातील मृतांची संख्या घबराट वाढवू लागली. एकेका स्मशानभूमीमध्ये एका दिवसात 42 मृतदेहांचे दहन व्हावें ! ऐकून जीव थरथरू लागला .त्याच्या जोडीला इतर अनेक तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या राजकीय उलथापालथी ऐकू येऊ लागल्या. आणि काय अनुभवतोय आपण हे सगळं म्हणून स्वतःलाच चिमटा काढून खात्री करून घ्यावी लागतेय.

जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा , वाड्मयाचे इतिहासामध्ये अनेक लेखकांनी अशा इतिहास घडवणाऱ्या, उलथापालथ घडविणाऱ्या गोष्टींच्या नोंदी, नव्हें आँखो देखे हाल नोंदवून ठेवलेत. अनेक परकीय भाषेतील लेखकांचा यात समावेश आहे.

डॅनियल डिफो या सुप्रसिद्ध इंग्लिश पत्रकार आणि कादंबरीकाराने आपल्या आयुष्यात व्यापारी पणं हेरगिरी करत असताना १७१९ साली “रोबिन्सन क्रुसो “हे जगातल्या सर्व भाषांमध्ये अनुवादित झालेले पुस्तक लिहिले आणि त्यानंतर तीन वर्षांनी” ए जर्नल ऑफ द प्लेग इयर “हे पुस्तक प्रकाशित केले .१६६५ मध्ये लंडन मध्ये ब्ल्यू बोनिक प्लेग, किंवा गाठीचा प्लेग त्याची साथ आली. त्यावेळेस लेखक फक्त पाच वर्षाचा होता. या प्लेगने संपूर्ण लंडन शहराला विषारी विळखा घातला .आज वरच्या जगभरात झालेल्या महामारीच्या यादीमध्ये हा प्लेग अत्यंत कुविख्यात आहे. मुख्य म्हणजे या पुस्तकाच्याच्या फ्रंट पेज वर कुठेही डीफोचे नाव नाही .तर फक्त या प्लेग मारामारीच्या काळात, लंडनमध्ये सातत्याने वास्तवाला असणाऱ्या आणि प्लेग महामारी लंडन शहरात पसरलेली असताना त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नागरिकाने हे पुस्तक लिहिलेले आहे असे केवळ लिहिलेले आहे आणि आणि त्यामुळे हे पुस्तक विश्वसनीय पण आहे. डीफोने हा प्लेग अनुभवलेल्या अनेक लोकांच्या साक्षी, लंडनच्या महापौरांनी जाहीर केलेली प्लेग च्या काळातील घोषणापत्र, वैद्यकीय पुरावे आणि सर्व संबंधित साहित्य या साऱ्यांचा अभ्यास करून या कादंबरीचा आराखडा मांडला गेला असल्यामुळे हे पुस्तक अतिशय धक्का सत्य आहे. एवढेच नाही तर या महामारी मध्ये बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांचे दुःख ,सुरक्षेच्या कारणावरून कुटुंबियांना भेटू देणे नाकारले गेले ,बळी गेलेल्या कुटुंबियांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित होऊ शकले नाही या सगळ्या गोष्टी यात मांडलेले आहेत .ज्या वेगवेगळ्या पद्धतीने या प्लेगला काबूत आणले गेले, त्याचा गंभीर परिणाम लोकांच्या भावनिक वर्तनावर झाले आणि या सगळ्यांचे नेमके चित्रण डीफो ने केले आहे.

“कॉनटेजिअन “हा सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला. आज इसवी सन 2020 मध्ये नऊ वर्षानंतर तशीच सिनेमात दाखवल्याप्रमाणे संसर्गजन्य आजाराची महाभयंकर साथ आली. हा सिनेमा काल्पनिक गोष्टीवर आधारित आहे. पण हीच कल्पना 2020 झाली सत्यात अवतरली आहे. सिनेमातले सर्व प्रसंग जगभरातल्या लोकांनी अनुभवले. सिनेमाची कथा व पटकथा लेखक स्कॉट झी बर्न्स हे असून दिग्दर्शक स्टीवन सोडर बर्ग आहेत .अमेरिकन सिनेसृष्टीतील सर्वश्रेष्ठ पारितोषिक ऑस्कर विजेते आहेत. खरोखरच अशावेळी कल्पकतेला सलाम करावासा वाटतो.

उलथापालथ घडवणार्या घटना या लेखकांना ,कलाकारांना नेहमीच खुणावतात. साहित्यनिर्मिती असली तरीही त्यात भरपूर प्रमाणात वास्तवाचा आधार असतो आणि म्हणूनच त्या अनेक वर्ष वाचल्या जातात .Traume ही एक ग्युंटर आईश ने लिहिलेली श्रुतिका ची साखळी आहे. थोडक्यात ही पाच दू:स्वप्ने आहेत. एक जर्मन कवी आणि लेखक आहे .यातील प्रत्येक स्वप्नातले कथानक दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तात्कालिक सामाजिक ,राजकीय ,पार्श्वभूमीवर घडते .स्मृती आणि विस्मरण,. विस्थापन आणि उत्तरदायित्व पलायन आणि शरणागती ही मूळ सूत्रे आहेत. एकाच कालखंडामध्ये पण वेगवेगळ्या खंडांमध्ये घडणाऱ्या या घटना ! एक जर्मन विस्थापित दुसरे महायुद्ध संपल्यावर तीन वर्षांनी या स्वप्नांची कहाणी उलगडते. एक जर्मन पुरुष ,एक चिनी स्त्री, एक ऑस्ट्रेलियन पुरुष, एक रशियन पुरुष आणि अमेरिकन स्त्री पाच जणांची ही पाच दू: स्वप्ने ! कुठलाही संकट किंवा महामारी आली की अफवांना पूर येतो. सध्याच्या कुरणा काळातही आपण हे अनुभवतो आहे.

याच प्रकारचा उल्लेख” द बिट्रोथड “या सुप्रसिद्ध इटालियन ऐतिहासिक कादंबरी मध्ये आढळतो उत्तर इटली वर स्पॅनिश राज्यकर्ते राज्य करत असताना 1630 मध्ये मिलन मध्ये प्लेगने हैदोस घातला .त्याच्या वर्णनातल्या काही भागांमध्ये अशा गोष्टी आढळतात .त्यात लिहिले आहे की ज्या आरिष्ठांनी नगरातल्या हजारो लोक नवीन लोकांना संपविले, याचे कारण शोधणे अवघडच होते. त्याचे भयानक परिणाम अमान्य करणे अशक्य होते. डॉक्टर्स आधीच या रोगाचे खरे स्वरूप मान्य करायला तयार नव्हते कारण ती त्यांच्या चुकीची निर्भटस्ना झाली असती. त्यामुळे त्या काळच्या समजुतींशी मिळतीजुळती एक कल्पना त्यांनी लढवली. त्या काळी संपूर्ण युरोपात एक समजूत प्रचलित होती. जादूटोना करणारी मायावी अस्तित्वात असतात. या मायावी लोकांनी यावेळी सापाच्या विषासारखी गरल पसरवून चेटूक करून प्लेग पसरवण्याचा डाव केला होता. त्यातच आदल्या वर्षाच्या शेवटी राजा फिलीप चौथा याच्याकडून एक फतवा अाला की विष पसरवणारी, संसर्गाचे सामान पसरवणारे चार संशयित फ्रेंच माणसे मादरीत कडून पळाली आहे. ती माणसे मिलान ला तर आली नाहीत ना? जेव्हा प्लेग पसरू लागला तेव्हा सगळ्यांना हे मान्य झाले. दुसऱ्या दिवशी एक नवेंच आणि अधिकच विचित्र दृष्य पाहून नगरवासी यांचे डोळे विस्फारले. नगरातील सर्व घरांच्या भिंती आणि दरवाजांवर मोठे पिवळट पांढरे पट्टे थापले होते .ते काम स्पंजच्या साह्याने केल्याचे दिसत होते. लोकांना भिवविण्यासाठी काढलेली ही विकृत खोडी होती.

अशा प्रसंगांमध्ये लोक घाबरलेले असतात. त्यावेळी अशा अफवा पसरून संकटांना तोंड देण्यास तयार नव्हते उलट लोकांचे मनोधर्य, खचविणाऱ्या अफवा त्यात भर घालतात. हीदेखील ऐतिहासिकच गोष्ट आहे. असं जेव्हा लक्षात येत तेव्हा तर लोकांनी विशेष जागृत राहिला पाहिजे.

अशा अनेक कलाकृती, अनेक कथा , कादंबऱ्या, पिक्चर्स अशा घटनांवर आधारित आहेत.

अशा घटनांमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतात ? त्यावर आतापर्यंत कशी मात केली गेली ? हे तर आपल्याला कळतं आणि” हे ही दिवस जातील “याची खात्री सुद्धा पटते.
(संदर्भ : उत्तम अनुवाद अंक )

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button