कमी, पण २०२१ मध्येही कोरोना राहणारच – डॉ. रणदीप गुलेरिया

Dr Randeep Guleria

नवी दिल्ली : २०२१ मध्ये कोरोनाची (Corona) साथ संपलेली असेल असे नाही; पण बरीच नियंत्रणात आली असेल. कोरोनाची साथ केव्हा संपेल हे २०२१ च्या सुरुवातीची स्थिती पाहून सांगता येईल, असे डॉरणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) म्हणाले.

 डॉरणदीप गुलेरिया हे केंद्र सरकारच्या कोविड – १९ (Covid-19) टास्क फोर्सचे महत्त्वाचे सदस्य आहेत. दिल्लीसह सध्या देशाच्या काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या चाचण्यांची वाढलेली संख्या आणि लोकांनी कोरोनाबाबत दक्षता न घेणे या कारणांमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे, असे ते म्हणाले. या वर्षअखेर कोरोनावरची लस बाजारात येऊ शकते. भारतात तीन स्वदेशी कंपन्या लस तयार करण्याचे काम करत आहेत. याला अजून काही वेळ लागेल. सर्व निर्विघ्न पार पडले तर या वर्षाच्या अखेर लस मिळू शकेल. लस सुरक्षित असणे आवश्यक आहे, असे गुलेरिया म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER