कोरोनाचे थैमान : जगभरात रुग्णांची संख्या ४८,९३,१८६

मुंबई : जगात आज (२२ मे) रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४८,९३,१८६ झाली आहे. ३,२३,२५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४,४६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,०३,९८१ रुग्ण आढळले आहेत.

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,१८,४४७ आहे. ३,५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६,०८८ नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात हा आकडा ४१,६४२ रुग्ण. १,४५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २,३४५ नवे रुग्ण आणि ६४ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ६.६१ टक्के, भारतात ३.०२ टक्के आणि महाराष्ट्रात ३.४९ टक्के आहे.

ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. ही आकडेवारी २२ मेच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER