शरद पवारांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळेंनी जे जे रुग्णालयात घेतली कोरोना लस

coronavirus-ncp-supriya-sule-vaccinated-in-jj-hospital-mumbai

मुंबई : देशभरात सोमवारी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली . राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील लस घेतली असून पात्र असणाऱ्या सर्वांना घेण्याचं आवाहन केलं आहे. याआधी शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील जे जे रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लस घेतल्याची माहिती दिली आहे. मुंबईमधील जे जे रुग्णालयात मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. डॉक्टर लहाने आणि जे जे रुग्णालयातील सर्व टीमचे आभार. करोना लस सुरक्षित आहे. सर्वांना विनंती आहे की, नोंदणी करा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा लस घ्या , असे त्या म्हणाल्या .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER