पुढील काळात दोन मंहत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत … पण, आपण इतिहास रचू – शरद पवार

लागोपाठ ट्विट करत शरद पवारांनी व्यक्त केली राज्यावरील संकटांची चिंता; म्हणाले, आपण 'इतिहास रचू'

Sharad Pawar

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लॉकडाऊन आणि कोरोनानंतरची राज्याची स्थिती काय असेल यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्याला कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल याची यादीच शरद पवारांनी काढून ठेवली आहे व राज्य सरकारने यासाठी पुर्वतयारी करण्यास सज्ज राहणे आवश्यक आहे असा इशाराही दिला आहे. देशासोबत राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. भारतात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झाले आहेत. कोरोनापासून राज्याला वाचवण्यासाठी राज्य सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. कोरोनाने संपूर्ण जगाला वेढले आहे. संपूर्ण देशांची आर्थिक घडी विस्कटवलीच नाही तर मोठ्या आर्थिक खाईत लोटले आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्याला आधीच अस्मानी संकटाने घेरले असताना आता कोरोनाने राज्याला पुरते खिखिळे केले जात आहे. याविषयी चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी लागोपाठ पंधरा ट्विट केले आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणातून चिंता व्यक्त करत कोव्हीड फंडची स्थापना केल्याची माहिती दिली होती. उद्धव ठाकरे यांनाही जनतेशी संवाद साधताना ‘या सर्वांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे याची आम्हाला कल्पना आहे पण सध्या जीव वाचवणं महत्वाचं आहे,’ असे म्हटले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनीही राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात –
बेरोजगारी वाढणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार कोरोनाच्या संकटाचा अनेक घटकांवर परिणाम होणार. “पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम.

कोरोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत आहे की पुढील काळात रोजगार कमी होऊन, बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे. यासाठी मी राज्याचे मा.मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, पुढील काळात तज्ज्ञ, जाणकार लोकांना एकत्र आणून उपाययोजनांची चर्चा करावी,”

शेतकऱ्यांवर परिणाम होणार –

“शेती व्यवसायाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्या देशात गव्हाचे उत्पादन उत्तरेकडे व तांदळाचे दक्षिण भारतात होते. आता रब्बी हंगाम पूर्ण होत आहे,शेतात पिके उभी आहेत. ती काढली नाहीत तर शेती अर्थव्यवस्थेवर व शेतकऱ्यांवर परिणाम होईल. याकडे केंद्राने लक्ष द्यायला हवे,”

सणवारासंदर्भात काही नियमांच पालन करावं लागेल –

देशाच्या कोरोनासंबंधीच्या स्तितीवर बोलताना शरद पवार यांनी

तब्बल १५ ट्विट केले आहेत. करोनाशीसंबंधित वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी यामधून भाष्य केलं आहे. “देशात लॉकडाऊन जाहीर झाले त्याचा आजचा हा तेरावा दिवस आहे. अजून आठ दिवस बाकी आहेत. या उर्वरित दिवसांत ज्या सूचना केल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. इतर देशांचे चित्र पाहिल्यास ते अधिक भयावह आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४०६७ कोरोना केसेस आहेत. त्यापैकी ३७६६ केसेस अॅक्टिव्ह आहेत. त्यांची काळजी वैद्यकीय क्षेत्रातील लोक काटेकोरपणे घेत आहेत. देशात ११८ मृत्यू झाले असून ३२८ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत,” असं पवारांनी पहिल्या दोन ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावरील मेसेजबद्दल सावधानतेचा इशारा –

व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मेसेजेसबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असून यातील पाचपैकी चार मेसेज हे खोटे असतात.

“आपण योग्य काळजी घेतली तर इतर रुग्णांनाही या आजारातून बाहेर काढू शकतो. यासाठी सरकारने केलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करूया. या सगळ्या परिस्थितीत सर्व समाजाला एकत्र राहण्याची गरज आहे. जात-धर्म न पाहता एक सामाजिक सलोखा सगळ्यांनी जपण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर सध्या जे मेसेजेस येत आहेत त्यातून अफवा पसरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होतेय. विशेषतः व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मेसेजेसबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

आपण कोरोनाचे युद्ध जिंकू, भारत इतिहास रचणार –

कोरोनाविरुद्धचा लढा आपण नक्की जिंकू “सध्या आपणा सर्वांना एक निश्चय करायचा आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनावर मात करायची आहे. करोनाविरोधात जिंकण्याचा इतिहास आपण रचू, असा विश्वास मला आहे,” असं पवार १५ व्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीन वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. या ऐतिहासिक प्रयोगाचे मुख्य सुत्रधार, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे. त्ामुळेच वेळोवेळी राज्य सरकारला ते संकटांचा सामना करण्यासाठी पुर्वतयारीसाठी म्हणून त्या संकटांशी सामना करण्यासाठी राज्य सरकारला सावध करत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.