लहान मुलांना कोरोनाची लागण, सावधगिरी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स

Rajesh Tope - Coronavirus - Maharashtra Today

मुंबई : सध्या राज्यात लहान मुलांना कोरोनाची (Corona) लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता खबरदारी म्हणून राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले की, त्यांनी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा दिला जात आहे. अशातच केंद्राकडून तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याला रोखण्यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने तयार केला जाईल. तसेच पुढे बोलताना रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गुरूवारी रात्री विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला, अशी माहिती टोपे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेवर प्रकाश टाकला. त्यांनी महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी लसींचा साठा अपुरा असल्यामुळे केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केलं आहे. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यावर बोलताना टोपे यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत रशीयन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी बोलणी सुरू आहे. तसेच, जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहेत. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर ३ लाख रेमडेसीव्हीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button