‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा… ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घेतला आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्वाची पाऊले उचलले आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत .

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Testing) वाढवा, हाय रिस्कमधील रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधा. एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवान बैठका घेतल्या. त्यावेळी अनेक ठिकाणी नोंदणीच केली जात नसल्याचेही समोर आले. अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यात ताळमेळ नाही. तर काही ठिकाणी आकडेवारी आॅनलाईन भरण्याचे आदेश असताना ती भरलीच जात नाही, असेही एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही मागे लागून थकलो, तुम्ही बातमी दिली बरे झाले, आता तरी सुस्तावलेले अधिकारी कामाला लागतील, अशी प्रतिक्रीया आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. तर अनेक जिल्हाधीकाऱ्यांनी आमच्यासोबत राज्याचे आरोग्य सचिव बोलतच नाही, अशा तक्रारी केल्याची माहिती काही पालकमंत्र्यांनी केली. आरोग्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सवर बोलावे, अशी मागणी करुनही त्यांनी आमच्याशी संवाद साधला नसल्याचे काही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER