पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार १२५ वर

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार १२५ वर

पुणे : शहरात नव्याने ५२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या १६,१२५ झाली आहे. तर ३२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ६,०६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी आता १,०८,००३ झाली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ३२४ रुग्ण अत्यवस्थ असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही ६ हजार ६५ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५२३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात रविवारी २२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६१३ झाली आहे. दिवसभरात एकूण ३२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २८३ रुग्ण, ससूनमधील १७ तर खासगी रुग्णालयांमधील २८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ४४७ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER