मुंबईत गेल्या २४ तासांत ७१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ आहे. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहेत. मुंबईत २४ तासांत हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले  होते.

पण आता हजारापेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ७१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार ८४६वर पोहचली असून यापैकी आतापर्यंत ६ हजार १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत २४ तासांत २ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८४ हजार ४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER