कोल्हापुरात कोरोना आटोक्यात

Kolhapur Coronavirus

कोल्हापूर : सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) पालन, सक्तीने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, ‘मास्क नाही दुकानात प्रवेश नाही’ या जिल्हा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन केल्याने कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कोरोना (Corona) आटोक्यात आल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 205 होती, ती 29 ऑक्टोबरपर्यंत 55 वर आली आहे.

दररोज आठशे ते एक हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत होती. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नव्हते. रोज 30 ते 35 मृतांची संख्या होती.

स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही जागा मिळत नव्हती. कोरोनाच्या भयंकर विळख्यात कोल्हापूर जिल्हा अडकला होता; पण आता मोठा दिलासा मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लाट सुरू झाली, ती एप्रिल महिन्यात. सुरुवातीला कोल्हापूर शहर व जिल्ह्यात एक-दोन बाधित रुग्ण आढळले, की नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. लॉकडाऊन (Lockdown) काळात परराज्य व अन्य जिल्ह्यांतील नागरिकांची वाहतूक सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. यात कोल्हापूर शहर आघाडीवर होते. शहरात एकट्या राजारामपुरी परिसरात 500 ते 600 रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकही असा तालुका शिल्लक राहिला नाही, जेथे कोरोना रुग्ण आढळला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER