Coronavirus : अजित पवारांच्या बैठकीला निम्मे आमदार उपस्थित

Ajit Pawar

पुणे : वाढत्या कोरोनासंदर्भात (Corona) आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला ५० टक्क्यांहून कमी आमदार उपस्थित होते. त्यामुळे शहराच्या आणि जिल्ह्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गंभीर आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. आजच्या या बैठकीत पुणे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि कॉलेजदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ३ खासदार, तर २१ पैकी ८ आमदार हजर होते. खासदारांपैकी पुणे शहराच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या, तर आमदारांपैकी दत्तात्रेय भरणे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल उपस्थित होते. दरम्यान या बैठकीमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, म्हणून या मागणीला विरोध केला. अखेर २८ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER