सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, आर्थिक संकट दूर करण्यासाठी सुचवले पर्याय

coronavirus-crisis-sonia-gandhi-suggests-to-pm-modi

नवी दिल्लीः संपूर्ण जग कोरोना या साथीच्या आजारसोबत लढा देत आहे. अशावेळी भारतातील सर्वपक्षांचे राजकीय नेतेदेखील राजकारण बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळत आहे.

ही वेळ कोणत्याही राजकारणाची नाही तर एकमेकांना साथ देण्याची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या आशयाचं ट्विट केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोविड – 19 विरूद्ध लढा देण्यासाठी आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पैशांची बचत कशी करता येईल यासाठी पाच उपाय सुचविले आहे. ज्यात सरकार आणि पीएसयूद्वारे करण्यात येणा-या सरकारच्या जाहीराती दोन वर्षांसाठी पूर्ण बंदी घालणे आणि केंद्रीय व्हिस्टा सुशोभिकरण प्रकल्प स्थगित करणे यासह काही उपाय सांगितले आहेत.

सोमवारी पंतप्रधान मोदींनी गांधींसह सर्व विरोधी नेत्यांशी ट्विट करून संवाद साधम्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण न करता कोरोनाविरूद्ध एकत्र येण्याचा संदेश दिला होता. त्यांच्या ट्विटला राहुल गांधीनीही सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर कॉंग्रेस अधक्ष सोनिया गांधी यांच्याकडून या सूचना आल्या. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात गांधी यांनी भारत सरकारच्या खर्चाच्या अंदाजपत्रकात (वेतन, पेन्शन आणि केंद्र सरकारच्या योजनांव्यतिरिक्त) 30 टक्के प्रमाण कमी करण्याविषयीही सांगितले आहे.

सरकारनं इस्पितळ बांधण्यावर, वैद्यकीय उपकरणे खरेदीवर भर द्यावा.

सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी प्रसारमाध्यमांवर जाहिराती देऊ नयेत. तसेच २० हजार कोटी रुपयांच्या लुटेन्स दिल्लीच्या पुनर्बांधकामाचे आणि सौंदर्यीकरणाचे काम रद्द करावे असं गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच, मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय घ्यायला हवेत असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.