अशोक चव्हाणांच्या घराशेजारी आढळलेत कोरोनाचे १० रूग्ण ; परिसरात चिंतेचे वातावरण

Ashok Chavan

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांच्या पार पोहचली आहे. भारतात नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण मुंबईत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. पण इकडे नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या नई आबादी भागात दोन दिवसांत १० करोना रुग्ण आढळल्याने शिवाजीनगर प्रभागात चिंतेचे वातावरण आहे .

कोरोनाची लागण झाल्याने अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले असून तिथे १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहेत.

दरम्यान नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झालेले असतानाच ग्रामीण भागातूनही संशयित रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. शहराच्या नई आबादी भागात गुरुवारी ५ रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ शुक्रवारीही त्यात ५ जणांची भर पडली. माहूरलाही एक रुग्ण आढळला त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८९ वर गेली आहे. गेल्या बुधवारी नांदेडमध्ये २३ जणांना कोरोनासंसर्ग झाल्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यानंतरच्या दोन दिवसांत १४ नवे रुग्ण समोर आले आहेत. काल आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये चार पुरूष व तीन महिलांचा समावेश असून ते १३ ते ५० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER