जे. पी. इन्फ्राकडून दुर्लक्षित बंगाली मजुरांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला न्याय

cm-uddhav-thackeray helped jp-infra-bengali-laborers

मुंबई : मीरा भांईंदर येथील अव्वल जे. पी. इन्फ्रा या बांधकाम कंपनीने तेथील कर्मचा-यांची जबाबदारी न घेता त्यांना या कठीण काळात वा-यावर सोडून दिले. त्या 860 बंगाली मजंरांची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांना न्याय मिळवून दिला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मजुरांची व्यथा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर या मजुरांची दोन वेळच्या जेवणाची आणि पगाराची आता सोय झाली आहे.

मीरा भाईंदर येथे जे. पी इन्फ्रा ही सर्वात मोठी बांधकाम कंपनी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाून असल्यामुळे सध्या काम बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-या या मजुरांच्या देन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. खरे तर जे. पी इन्फ्रा या कंपनीनीने या अडचणीच्या काळात मजुरांची सोय करायला हवी होती. मात्र, कंपनीने वा-यावर सोडून दिल्याने या मजुरांनी आपली व्यथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडे व्य्कत रेली. त्यानंतर ममता यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून ही माहिती दिली.

याची लगेच दखल घेउन मख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ संबंधित अधिका-यांना आदेश दिले.

राज्याचे कामगार आयुक्त प्रताप सरनाईक यांनी या मजुरांच्या जेवणाची वेळीच योग्य सोय केली. तसेच, सरनाईक यांनी जे. पी इन्फ्राला धारेवर धरले व या सर्व कामगारांसाठी दैनंदिन गरजेचे किमान 15 दिवसांचे अन्न धान्य पुरवावे असे सांगितले.

कोरोनाचे संकट : ‘त्या’ कामगारांच्या मदतीसाठी ममता बॅनर्जींनी केला थेट उद्धव ठाकरेंना फोन