चंद्रपुरात 11 रशियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात

coronavirus-chandrapur-11-foreigners-sent-for-home-quarantine

चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राजधानीपासून ते गावापर्यंतचे पोलिस प्रशासन लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करित आहेत.

कोणतेही राज्य, शहर, गाव असो परदेश तसंच इतर राज्यांमधूनल आलेल्यांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, चंद्रपुरात रशियन नागरिकांनी छुप्या पद्धतीने प्रवेश करून पोलिसांपासून ही माहिती लपवली. मात्र, चंद्रपूर पोलीस सतर्क असल्याने त्यांना शहरात परदेशी नागरिकांच्या येण्याचा सुगावा लागला आणि रशियामधील ११, दिल्ली, ओडिसा व केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १४ जण मशिदीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. या १४ व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रामनगर पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशासह राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सर्व जिल्हा, राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. परदेश तसंच दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वारंटाइनमध्ये रहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार देण्यात येत आहेत.

मात्र, येथील तुकुम परिसरातील एका मशिदीत रशियातील ११, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १४ व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १४ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना वन अकादमी येथे होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

रोजगारासाठी गुजरातमध्ये गेलेले शेकडो मजुर राज्यात परतले


Web Title : 11 Russian civilians in police custody in Chandrapur

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

मराठी बातम्या चंद्रपूर – चंद्रपूर न्यूज़