राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८ वर ; १५० नवे रुग्ण

coronavirus-cases-1018-in-maharashtra

मुंबई :- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात १५० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता कोरोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात पत्रकही जारी कारण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे.  दिवसभरात राज्यातील १५० जणांचे चाचणी अहवाल कोरोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान देशभरात कोरोनाचे ५०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत  समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता ४७८९ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १२४ झाली आहे.

आजची कोरोना रुग्णसंख्या :

  • मुंबई – ११६
  • पुणे – १८
  • अहमदनगर – ३
  • बुलडाणा – २
  • ठाणे – २
  • नागपूर – ३
  • सातारा -१
  • औरंगाबाद – ३
  • रत्नागिरी – १
  • सांगली – १