नागपूरमध्ये ‘कॅन्सर’ग्रस्त रुग्णाने केली कोरोनावर मात

Corona Virus Nagpur

नागपूर : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे .या सगळ्या चिंतेत भर घालणाऱ्या वातावरणात काही दिलासादायक आणि उमेद वाढवणाऱ्या घटनाही समोर येत आहे. नागपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. कर्करोग झालेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. आधीचं जीवघेणी व्याधी जडलेली असताना करोनाचा संसर्ग झाला. पण, या व्यक्तीनं जगण्याच्या जिद्दीवर करोनालाही मात दिली आहे.

राज्यात आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

नागपुरात सोमवारी दिवसभरात नऊ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर पाच जण उपचार घेऊन करोनातून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे करोनामुक्त झालेल्या या रुग्णांमध्ये एका कॅन्सर असलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे. शहरात सोमवारी करोनाची लागण झालेल्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकला, पाच आणि सात वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे नागपुरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १६० वर पोहोचली आहे.