नागपुरात कोरोनाचा पहिला बळी; ६८ वर्षीय रुग्ण दगावला

Corona Virus

नागपूर :- नागपुरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. यामुळे नागपूरकरांच्या हृदयाचे ठोके आता वाढले आहेत. सतरंजीपुरा येथील बडी मस्जीद परिसरातील एका ६८ वर्षीय नागरिकाचा कोरोनाची बाधा झाल्याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्रावाचा अहवाल सोमवारी सकारात्मक आल्याने यावर अधिकृत शिक्कामोर्बत झाले. त्यामुळे नागपुरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे या कोरोनाबाधिताला कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नाही.

त्यामुळे हा समुदाय प्रादुर्भावाचा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे. ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नातेवाइकांनी शनिवारी रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात आणल्यानंतर, त्याला जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगत दाखल करून घेण्यास दबाव आणला होता.

मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून ही कोरोनासदृश आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याने रुग्णालयाने त्याला तातडीने कोरोना वॉर्डात दाखल केले होते. याच दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्या घशातील स्रावाची सोमवारी प्राधान्यक्रमाने तपासणी करण्यात आली. त्यात त्याच्या नमुन्यात कोरोना विषाणूचा अंश आढळला.


Web Title : Coronavirus 68 year old man death due to covid 19 in nagpur

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)