
मुंबई :- कोरोना नियंत्रणाच्या कामांवर मागील सहा महिन्यांत मुंबई मनपाचे १६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मनपाने याचा हिशेब दिला नाही. कोरोना नियंत्रणाच्या कामासाठी मनपाने आणखी ४०० कोटी रुपये मागण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, यावर महापौरांवर भष्ट्राचाराचा आरोप करताना भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रश्न विचारला, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले ?
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अद्याप कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले नाही. ब्रिटनवरून(Britain) आलेल्या नव्या कोरोना व्हायरसमुळे (New corona virus) शाळा, कॉलेज सुरू करण्याचे निर्णय लांबणीवर टाकले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद आहेत. मुंबई लोकल (Mumbai Local) अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आल्या नाहीत. अशातच आता मुंबई पालिकेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून ४०० कोटींचा अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी केली आहे.
आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले, मुंबई महापालिकेचे कोरोनावर सहा महिन्यांत १६०० कोटी खर्च झाले तरी अजून ४०० कोटी हवेत असे महापालिका म्हणत आहे. खर्च झालेल्या पैशाचा हिशेब का देत नाहीत? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले ? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले ?
पर्यावरणप्रेमी वरळीला किती गेले ? दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ४०० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव परत पाठवा, अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली. तो शिवसेनेने नामंजूर का केला? का लपवाछवी करता आहेत ? हिशेब द्या. मुंबईकर कोरोनाने दगावले. मात्र महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करून भरले.
मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च
तर अजून 400 कोटी हवे असे पालिका म्हणतेय..
पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही?
महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?
सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले?
पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2020
400 कोटी रुपये मागणीच्या प्रस्तावाला परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली ती शिवसेनेने ना मंजूर का केला?
का लपवाछपवी करताय? हिशेब द्या!
मुंबईकर कोरोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला