कोरोनाचा धोका टळला नाही, सतर्क राहा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) धोका कायम आहे. रुग्ण वाढत आहेत. पुन्हा टाळेबंदीची वेळ आणू नका. कोरोनाचे नियम पाळा; कोरोनापासून दूर राहा, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संबोधित केले. दसरा, दिवाळी, ईद, छटपूजा व इतर सर्व सण साधेपणाने साजरे करा, या सरकारच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला.

त्यानंतर हळूहळू सर्व खुले करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली. आता सर्व धार्मिक स्थळे खुली केली आहेत. पण, मंदिर, मशिदींमध्ये गर्दी करू नका. कार्तिकी वारी गर्दी न करता करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची लक्षणे आहेत. दुसरी लाट आली तर स्थिती अतिशय गंभीर होईल. म्हणून सावधता बाळगा. मास्क वापरा, गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. हात वारंवार धूत राहा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; पण या संदर्भात करण्यात आलेल्या शिक्षकांच्या चाचणीत अनेक शिक्षक कोरोना ‘पॉझिटिव्ह’ निघाले. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थिती पाहून घेण्यात येईल, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER